Mahatma Gandhi Mission's

NANASAHEB KADAM COLLEGE OF AGRICULTURE

College Code: 11273   Established : 2012, ISO 9001:2015, GANDHELI, AURANGABAD
Affiliation to Vasantrao Naik, Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani. Grade-A

एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाकडून खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन दि.२८ मे २०२१ रोजी करण्यात आले होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जी.आर.रेड्डी संचालक एमजीएम हिल्स गांधेली होते,या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.एस.बी.पवार (सहयोगी संचालक,राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद) तसेच डॉ.एम.बी.पाटील (प्रभारी अधिकारी,फळ संशोधन केंद्र,औरंगाबाद) यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये प्रामुख्याने डॉ.एस.बी.पवार यांनी खरीप हंगामातील मुख्य पिकांचे व्यवस्थापन या विषयावर खरीप हंगामातील कापूस,सोयाबीन व तूर या पिकांचे लागवड तंत्रज्ञान व उत्पन्न वाढीसाठी शास्त्रीय माहिती दिली, तसेच डॉ.एम.बी.पाटील यांनी आंबा व मोसंबी लागवड व व्यवस्थापन या विषयावर अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण तसेच बहार व्यवस्थापन याविषयी विस्तृत शास्त्रीय माहिती सादर केली. खरीप शेतकरी मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणुन डॉ.जी.आर.रेड्डी यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने समाधान व्यक्त केले व शेतकरी बांधवांसाठी अनेक कार्यक्रम राबवावे अशी साद घातली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.एस.ढवण (कुलगुरू) वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ,परभणी यांना तांत्रीक अडचणीमुळे कार्यक्रमास सहभागी होता आले नाही परंतु त्यांनी महाविद्यालयामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक आयोजनपर भाषणात प्राचार्य डॉ.एन.एम.मस्के यांनी महाविद्यालयाचा प्रगती आलेख व वैशिष्ट्ये कथन केली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते यांसह आंध्रप्रदेश येथील बहुतांश शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.आर.ए.शेळके यांनी विशेष मेहनत घेतली, यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले, सूत्रसंचालन प्रा.शेळके यांनी तर आभार प्रा.बी.जी.म्हस्के यांनी व्यक्त केले.
2021-05-29

औरंगाबाद तालुक्यातील पाचोड येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद येथील कृषिदुत सुयोग पवार यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक ॲप्स बद्दल माहिती दिली तसेच अनेक नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देत माहिती सांगितली. तसेच पिकांचे नियोजन, एकात्मिक कीड व्यवस्थापन रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यांचा संतुलित वापर, जमिनीची सुपीकता यासह अनेक विषयांबाबत जनजागृती केली. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये असणारे शेतमालाचे बाजारभाव,जनावरांना होणारे आजार त्यांची घ्यावयाची काळजी, लसीकरण. सेंद्रिय शेती यासोबतच शेतीसाठी लागणारे कीटकनाशके प्रामुख्याने निंबोळी अर्क (५%), दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, कंपोस्ट खत तसेच जैविक खत तयार करणे आणि वापराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषिदुतांनी गावात विविध ठिकाणी फलक लावले जे शेतकऱ्यांना विविध गोष्टीची माहिती देतील. यासोबतच गावातील अनेक समस्यांवर चर्चा झाली. पारंपरिक शेताबरोबरच नव्या तंत्रज्ञानावर आधारित फुल शेती, हरित गृह आणि विविध फळबागांचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. गावात गटशेती,बचत गटाच्या माध्यमातून नव्या योजना कशा आणता येतील यातून गावात रोजगार निर्मिती आणि आर्थिक उत्पन्न कसे वाढवू शकतो याचेही मार्गदर्शन केले. या कामासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य-डॉ.एन.एम.मस्के ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी व्ही.ओ.कोहीरे पाटील,प्रा.आर.ए.शेळके(विषय विशेषज्ञ कृषी विस्तार)व इतर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावातील शेतकरी भरत पवार, सोपान मदगे,अप्पासाहेब घोडके,बंडू शेजूळ व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2020-12-03

एम.जी.एम.हिल्स गांधेली येथील नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, शेतकरी हितार्थ कृषी क्षेत्रामध्ये भेडसावणाऱ्या कपाशीवरील एकात्मिक किड व खत व्यवस्थापन या महत्वाच्या विषयास अंतर्भूत करून या कार्यशाळेचे आयोजन केले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.जी.एम.हिल्स संचालक डॉ.जी.आर.रेड्डी होते,व विशेष उपस्थित डॉ.आर डी.अहिरे (सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय,उस्मानाबाद) होते.अध्यक्षीय भाषणात डॉ.जी.आर.रेड्डी यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त माहितीची कार्यशाळा आयोजित केल्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला.डॉ.आर.डी.अहिरे यांनी शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचे महत्त्व जाणून आपल्या शेतावर कृती प्रत्यक्षात आणावी अशी साद घातली व या विस्तार कार्याचे कौतुक केले. या ऑनलाईन कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉ.नंदकुमार भुते (सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ कापुस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने कीटकांची ओळख व नियंत्रण करण्याची पद्धती स्पष्ट केली व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले,डॉ.आर.पी.कदम (विभागप्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)यांनी डॉ.भुते यांनी विस्तृत माहिती दिल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले व आयोजकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा.आर.ए.शेळके (सहाय्यक प्राध्यापक)यांनी केले,या ऑनलाईन झुम आधारित कार्यशाळेचे संपुर्ण तंत्रसहाय्य प्रा.कदम पी.एम.(सहा.प्राध्यापक)यांनी केले.सदर ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के.पांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.त्यासह कार्यक्रम पूर्णत्वासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एन.एस.रोडे,डॉ.एस.बी.सातपुते,प्रा.व्ही.ओ.कोही रे पाटील,प्रा.के.एम.जाधव व सर्व प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली,या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी,कृषीसंबंधित विद्यार्थी,कृषी विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.कापुस या पिकासंबंधित योग्य व उपयुक्त माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
2020-07-21

MGM NKCA Gandheli RAWE Students Conducted Demonstration on Vermi-composting
2019-10-21

नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषि संबंधित योजनेची माहिती दिली.
2019-07-02