महात्मा गांधी मिशन संचलित नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधली,औरंगाबाद आयोजित सूक्ष्म सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर दि. ७ नोव्हेंबर, २०२० शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय वेबसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जी. रेड्डी (संचालक) एमजीएम हिल्स गांधेली तर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. व्ही.एम.भाले(कुलगुरू)डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.यु.एम.खोडके,सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य,कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी,या राष्ट्रीय वेबसंवाद कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.एम. एस.माने (विभाग प्रमुख)आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन,महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश मस्के यांनी महाविद्यालयातील व एमजीएम हिल्स परिसरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रम व सोयीसुविधांचा छायाचित्रांच्या आधारे आढावा सांगितला तसेच राज्यस्तरीय पुरी समितीचा"अ"दर्जा प्राप्त बहुमान मिळवलेले मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय असल्याचं आपल्या भाषणातून कथित केलं व शेतकऱ्यांना उपयुक्त विषय खत व्यवस्थापन कसे करावे? या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचं सांगितले.डॉ.यु.एम. खोडके यांनी प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात भारतीय शेती मध्ये कमीतकमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन करून वाढत्या लोकसंखेच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी खतांचा योग्य प्रमाणात वापर करून मानवी आरोग्यावर होणाऱ्या रासायनिक खताचा परिणामाविषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती मार्गदर्शनपर भाषणांमध्ये डॉ.व्ही.एम. भाले यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध शेतजमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा व पाण्यात विरघळणाऱ्या विद्राव्य खताचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले व वरील पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात व उत्पादकतेत भरघोस वाढ होईल असा दृढ विश्वास व्यक्त केला यांसह एमजीएम हिल्स परिसरात असलेल्या विविध तंत्रज्ञान व सोयीसुविधांविषयी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात डॉ.राजेंद्र जी.रेड्डी (संचालक)यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त यशोगाथा तयार करून वेगवेगळे तंत्रज्ञान वापरण्यासाठी उद्युक्त करावे तसेच जलसंधारणावर विशेष भर देऊन शेतकऱ्यांना तंत्रज्ञान युक्त मार्गदर्शन प्रसारित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यासह प्रमुख मार्गदर्शन सत्रामध्ये डॉ.एम.एस.माने यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी पाण्यात विरघळणारे खते त्याचे प्रकार व वापर करण्याच्या विविध पद्धती तसेच रासायनिक खताचा ठिबक सिंचन प्रणालीवर होणाऱ्या परिणाम विषयी व त्यापासून ठिबक सिंचन प्रणाली चे व्यवस्थापन कश्या प्रकारे करावे या विषयी सखोल माहिती दिली.या राष्ट्रीय वेबसंवाद कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातुन 485 शेतकरी,व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. तंत्रसहाय्य डॉ.पी.जी.चव्हाण,डॉ. पी. एस. देशमुख, प्रा.एम.एस.लवराळे, प्रा.बी.जी.म्हस्के यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर.ए.शेळके व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.व्ही. एस.कोहळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केले.
2020-11-08